(कामतपाडा,कर्जत)-वाजंत्री घाट-भोरगिरी किल्ला-गुप्त भिमाशंकर-भिमाशंकर-रानशीळ घाट-(नांदगाव,कर्जत) भटकंती.
वाजंत्री घाट-खेतोबा-भोरगिरी-भिमाशंकर-रानशीळ घाट प्रवासवर्णन..
हया शनिवारी(२८ जानेवारी२०२०) बेत आखला होता तो वाजंत्री घाटाने वर चढाई करायची.खेतोबाच दर्शन घ्यायचं व खेतोबा घाटाने खाली उतरायचं(??).पण प्रत्येकवेळी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत नाही याचा प्रत्यय याही वेळेस आला.मी व योगेशने सकाळची कर्जत लोकल पकडुन एसटी स्टंण्ड गाठलं.सकाळी ८.३०वाजता कर्जत-सोलनपाडा
ही बस पकडुन जांमरुंगला उतरलो तेव्हा १०वाजले होते.वातावरण प्रसन्न व स्वच्छ होत.जामरूंगपासुन उजव्या हाताला जवळच असलेल्या कामतपाडयावर आम्ही पोहोचलो.गावात वाजंत्री घाटाची वाट विचारली वाट पकडली.पाडयाबाहेर जाणारी वाट रूंद व छानपैकी मळलेली होती.परंतु पुढे काही अंतरावर आम्ही डावीकडची वाट पकडायची सोडुन उजवी वाट पकडली.ही अंधारीची/घोघोळ घाटाची वाट होती.पुढे वाट जंगलात हरवली.थोडा चाचपडुन पहिलं पण वर जाणारी वाट सापडलीच नाही.यात तीन तास वाया गेले.उन्ह वाढत होत.वेळ निघुन जात होता.खुप प्रयत्न करूनही वाट न मिळाल्याने नाईलाजान पाड्यात पर जाऊन वाटेची सुरूवात दाखविण्यासाठी कूणी मिळेल का हे पाहण्यासाठी मागे फिरलो.कामतपाडयात विचारपुस केल्यावर निवृत्ती बंगारे सोबत यायला तयार झाले.परत पाऊलवाटेला लागलो तेव्हा १.४०वाजुन गेले होते.वाजंत्री घाटाची वाट सौंम्य चढाईची,सरळ व मळलेली होती.वाटेने चढाईचे छोटे छोटे टप्पे पार करत आम्ही वर जात होतो.मला वाजंत्री घाटाची ही पायवाट खुपचं आवडली.वाट जास्त दमछाक of करणारी नव्हती.थोडीशी लांबची वाट इतकच.निवृत्ती बंगारे यांनी काही अंतर चालल्यावर डावीकडची वाट पकडली.वाट जंगलातील झमळलेली होती.
वाट पकडुन आम्ही चालत राहिलो.हळुहळु वाट एका डोंगरात शिरली.ही वाट पकडुन आम्ही वर चढाई करून लागलो.उजवी डावी व परत उजवीकडे येत एका अश्याटप्प्ये पार करत आम्हीवर आली जिथून एक वाट शिडीची व वाजंत्री घाट एकत्र मिळुन खेतोबाकडे जातात.
इथुन वखेतोबा जवळच होत.निवृत्ती बंगारेना निरोप देऊन काही क्षणात वर उजव्या हाताला वळण घेऊन मारल्यावर पोहोचलो.
(डावीकडुन योगेश,मध्ये निवृत्ती बंगारे व उजवीकडे मी)
घडयाळयात पाहिलं तर ४.४५वाजले.मंदीर जवळच होतं.खेतोबा मंदीरात पोहोचल्यावर दशन घेऊन थोडा विसावा घेतला.मला हया मंदीराची जागा पाहुन नवलच वाटल.समोर कोथळीगड,उजव्या हाताला पदरगड ही नजरेत भरत होता.अनेक दिवस वाजंतऐकुण असलेल्या वाजंत्री घाटाच्या सफरीने आज मी आनंदीत झालो होतो.कुठेही जास्त आढेवढे न घेता व शरीराला जास्त न थकवणारी वाजंंत्री घाटाची वाट मला भारी आवडुन गेली.असो.मंदीरात परत
५वाजल्यावर परत माघारी निघायचं ठरवलं.परंतु खेतोबा घाटाने उतरायच म्हटलतर कमीतकमी २तास लागले असते.(खेतोबा हा वेगळा धाघाट नसुन आलोतोच खाली वाजंत्री व शिडीघाटाला जोडतो हे त्यावेळेस मला माहित नव्हत) लागलं असत.त्यातुन यावेळेस दुचाकी सोबत नव्हती.परत जामरुंगवरून प्रवासी साधन मिळणं दुरापास्त होत.यामुळे खेतोबाने न उतरता भोरगिरी कडे जायचे ठरवले.मंदीरासमोरून जाणारी वाट पकडली.ही वाट काहि डोंगरटप्पे पार करून येळवली गावत गेली.येळवलीत पोहोचेपर्यंत ६.३० वाजले.येळवलीत चौकशी केल्यावर कळलं कि भोरगिरी गाव जवळच आहे.येळवलीत एके घरी चहा घेऊन आम््ही भोरगिरी ची लाट पकडली
.एव्हाना अंधार पडला होता.भोरगिरीत पोहोचेपर्यंत ७.१५वाजले होते.भोरगिरीत चौकशी करून एका घरी जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली.ते घर होतं पुणाजी काठे यांचं.पोटभर घरगुती जेवणाचा आस्वाद घेतल्यावर केल्यावर दिवसभराच्या प्रवासाने दोघेही लवकरच झोपी गेलो.दुसरया दिवशी पहाटे ५.३०ला ऊठुन आवराआवर केली व पुणाजी काटे स्वत सोबत आम्हाला भोरगिरी किल्ला दाखवायला आले.भोरगिरी किल्ला आकाराने छोटा व आटोपशीर आहे.६वाजले होते तरी प्रकाश नव्हता.आम्ही दोन गुफा व्यवस्थित पाहिलेल्या.नंतर वर जाऊन गडाला प्र
दक्षिणा घालुन पाण्याची ५-६टाकी पाहिली.
नंतर गड उतरून खाली गावात आलो व भिमाशंकर कडे जाणारा कच्चा रस्ता पकडला.
एव्हाना घड्याळात ७.४५ वाजले होते.पहाटेच्या आल्हाददायक व निर्मनुष्य रस्त्याने चालताना मन प्रसन्न होतं होत.४एक किमी अंतर चालल्यावर मुख्यपायवाट सोडुन डाव्या हाताला काही अंतर उतरून भीमानदीपात्रात गुप्त भिमाशंकर लागत.
भीमा नदीच्या पात्रात एक दगडाखाली कोरलेली पिंड व त्रीशुळ होत.हेच ते पवित्र गुप्त भिमाशंकरच ठिकाण.इथे दर्शन घेऊन भीमेचे पात्र पार करून पुढे जवळच साक्षीविनायकाच मंदीर आहे.इथे पोहोचेपर्यंत ९.१५वाजले होते.इथुन पुढे जंगलातील मळलेल्या पायवाटाने आम्ही भिमाशंकर मंदीराकडे निघालो.अर्धातास चालुन गेल्यावर आम्ही भिमाशंकर मंदीराजवळ पोहोचलो.ऐव्हाना ९.४५वाजले होते.
रविवार होता तरी मंदीरात गर्दी नव्हती हे पाहुन खुप हायस वाटलं.मंदीरात जाऊन लवकर दर्शन उरकलं.व पुढचा प्रवास अर्थात रानशीळ घाटाने उतरण्यासाठी बसस्टंण्डकडे निघालो.मंदीराबाहेरील वाटेवर असलेल्या बसस्टण्डच्याबाजुने रानशीळघाटाची मळलेली पाऊलवाट खाली उतरते.वाट सौंम्य उताराची व छान रचलेली आहे.
वाट उतरायला सुरूवात केली तेव्हा १०.४४ झाले होते.
उताराचे वेगवेगळे टप्पे पार करून सव्वा दोन तासानी आम्ही घाट उतरून
नांदगाव पासुन पुढे १.५ किमी एका रस्त्याला १वाजता पोहोचलो.त्याच रस्त्याने चालत नांदगाव गाठलं.नांदगाववरुन एका बाईकस्वाराला हात केला.त्यानी आम्हाला चाफेवाडीला सोडलं.तिथे जीप उभं होती.जीप पकडुन कशेळे गाठलं.कशेळेवरूनपुढे कर्जतला येऊन लोकलने मी बदलापुर गाठलं.अश्याप्रकारे दोन दिवसांची सुरेख भटकंती पार पडली..😊