Posts

(वाघाचीवाडी,मुरबाड)-डोणीचे दार/त्रिगुणधारा घाट-दुर्ग-खुटेदरा/खुट्टा घाट-रामपुर

Image
राम राम मंडळी आज काय रविवार म्हणजे सुट्टीचा.आराम करायचा दिवस.बरोबर ना?तुम्ही म्हणाल आराम नाहीतर दुसरं  काय करायचं? हप्त्यातून एकच तर दिवस मिळतो सुट्टीचा.बरोबर आहे.मग तुम्ही मला विचारलं तूही आरामच केला असणार?दुसरं काय करणार?तर मंडळी राग मानू नका.सांगायचं उद्देश हाच की भटक्यांसाठी सुट्टी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत  करण्याचा व भटकंतीसाठी सवडीचा एक निवांत दिवस ठरतो.इतका स गळा उहापोह करण्याऐवजी मी हे सांगुनच टाकतो की आज मी फिरायला गेलो होतो?कुठे?तेचतर सविस्तरपणे सांगणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत  ही पोस्ट नीट वाचा.त्याच काय झालं की मागच्या वेळेस मी व योगेश दोघांनी मिळून खुटेदरा घाट पार केला होता.पण उतरताना दोघेही  दार्याघाटाने उतरलो होतो .तेव्हापासून खुटेदरा घाट उतरायचं राहून गेला ही खंत दोघांच्याही मनात राहून गेली होती. सोबतच बरेच दिवसांपासून वाचनात  आलेला  खुतेदरा घाटाच्या बाजूलाच डोंगर रांगेत असलेला त्रिगुंधरा  घाटाचा विषय मनात घोळत होता.तेव्हा विचार करून त्रिगुंधारा घाटाने वर जायचं व खुटेदरांघाटाने उताराचा असा बेत मी व योगेशने ठरवला होता.दिवस नि...

भिवपुरी गाव(कर्जत)-खांडी घाट-कुसुर (मावळ)कुसुर घाट- कांब्रे लेणी.

Image
राम राम मंडळी.आज पुन्हा एक रविवार.सट्टीचा दिवस.पण सुट्टीचा दिवस म्हटला कि आमच्यासारख्या भटक्यांची पावले वळतात नवीन ठिकाणांच्या शोधात.मागच्यावेळेस वाट चुकल्यामुळे कुसुर घाट व वेळेअभावी खांडीघाट अपुरा राहिला होता.ती खंत मनात होतीच.तो अर्धवट राहिलेला ट्रेक या रविवारी मी  योगेश खोपकर सोबत पुर्ण केला.पण भटकंतीचा प्रवास इतका काही सोपा नसतो.भटकंती करताना अनेक घटना व प्रसंग घडतात.वेगवेगळे अनुभव येतात.एखाद्या कथेप्रमाणेच.तीच कहाणी मी इथे सविस्तरपणे वाचकांच्या पुढे मांडणार आहे.मला आशा आहे तुम्हीही ती वाचायला उत्सुक असाल.तेव्हा शेवटपर्येंत ही पोस्ट नीटपणे वाचा तेव्हा सर्व घटनांचा  उलगडा होईल.तर हया रविवारी मी  खोपकर दोघांनी भिवपुरीगावातुन खांडी घाटाने वर जायचं व कुसुर घाटाने खाली उतरून  परत भिवपुरीलायायच असं ठरवल होतं.पण त्याचसोबत मी ऐनवेळी कांब्रेच्या लेण्या पाहायला जायचा बेत यात जोडला.पण योगेशला ते आदल्यादिवशी मी सांगितल नव्हतं.सकाळी ७.१५ला कर्जत स्टेशबाहेर भेटायचं ठरवलं.योगेश त्याची अंक्टीवा घेऊन पनवेल चौकमार्गे कर्जतला येऊन मला भेटणार होता.रविवारी पहाटे ६.६मिनीटांनी योगेश...

वाल्हीवरे-नळीची वाट-हरिश्चंद्रगड-सादडे घाट-केळेवाडी

Image
नळीचीवाट--हरिश्चंद्रगड-तारामती-साधळे घाट बरेच  दिवस मनात हरिश्चंद्रगडला जायचा विचार मनात घोळत होता.पण योग काही जुळुन येत नव्हता.हरिश्चंद्रगड हा सर्वांच्या परिचयाचा व भटक्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.गडावर पाहण्यासारख खुप काही आहे.असो.शेवटी बरयाच विचारांती शुक्रवारी महाशिवरात्रीचा म्हणजेच शुक्रवारचा दिवस ठरला.स़ोबत जोडुन शनिवारी व रविवारी सुट्टी होतीच.पण गडावर जाण्यासाठी आम्ही वाट निवडली ती मुरबाड तालुक्यातील वालीवरे गावातुन जाणारी थरारक अशी नळीची वाट.शुक्रवारी सकाळी ६वाजता योगेश व मी कल्याण एसटी स्थानकात भेटलो.बसस्थानकातुन बोरिवली-अहमदनगर ही बस पकडली. बस ६.३०ला सथानकातुन निघाली.८.४०च्या सुमारास आम्ही सावरणे ह्या गावात उतरलो.सावरणे हे कल्याण-नगर या महामार्गाशेजारी माळशेज घाटाच्या सुरवातीलाच निसर्गाच्याकुशीत वसलेलछोटंसं व सुटसुटीत गाव. सावरणे गावात उतरल्यावर आजुबाजुच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा लक्षवेधुन घेत होत्या.त्या न्याहाळत आम्ही सावरणे तुन वालीवरेकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता पकडला.हया रस्त्याने चालताना निरव शांततेचा आनंद मिळत होता व वाट रमणीय होती.पुढे काह...

(कामतपाडा,कर्जत)-वाजंत्री घाट-भोरगिरी किल्ला-गुप्त भिमाशंकर-भिमाशंकर-रानशीळ घाट-(नांदगाव,कर्जत) भटकंती.

Image
वाजंत्री घाट-खेतोबा-भोरगिरी-भिमाशंकर-रानशीळ घाट प्रवासवर्णन..          हया शनिवारी(२८ जानेवारी२०२०) बेत आखला होता तो वाजंत्री घाटाने वर चढाई करायची.खेतोबाच दर्शन घ्यायचं व खेतोबा घाटाने खाली उतरायचं(??).पण प्रत्येकवेळी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत नाही याचा प्रत्यय याही वेळेस आला.मी व योगेशने सकाळची कर्जत लोकल पकडुन एसटी स्टंण्ड गाठलं.सकाळी ८.३०वाजता कर्जत-सोलनपाडा  ही बस पकडुन जांमरुंगला उतरलो तेव्हा १०वाजले होते.वातावरण प्रसन्न व स्वच्छ होत.जामरूंगपासुन उजव्या हाताला जवळच असलेल्या कामतपाडयावर आम्ही पोहोचलो.गावात वाजंत्री घाटाची वाट विचारली वाट पकडली.पाडयाबाहेर जाणारी वाट रूंद व छानपैकी मळलेली होती.परंतु पुढे काही अंतरावर आम्ही डावीकडची वाट पकडायची सोडुन उजवी वाट पकडली.ही अंधारीची/घोघोळ घाटाची वाट होती.पुढे वाट जंगलात हरवली.थोडा चाचपडुन पहिलं पण वर जाणारी वाट सापडलीच नाही.यात तीन तास वाया गेले.उन्ह वाढत होत.वेळ निघुन जात होता.खुप प्रयत्न करूनही वाट न मिळाल्याने नाईलाजान पाड्यात पर जाऊन वाटेची सुरूवात दाखविण्यासाठी कूणी मिळेल का हे पाहण्यासा...