वाल्हीवरे-नळीची वाट-हरिश्चंद्रगड-सादडे घाट-केळेवाडी
नळीचीवाट--हरिश्चंद्रगड-तारामती-साधळे घाट
बरेच दिवस मनात हरिश्चंद्रगडला जायचा विचार मनात घोळत होता.पण योग काही जुळुन येत नव्हता.हरिश्चंद्रगड हा सर्वांच्या परिचयाचा व भटक्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.गडावर पाहण्यासारख खुप काही आहे.असो.शेवटी बरयाच विचारांती शुक्रवारी महाशिवरात्रीचा म्हणजेच शुक्रवारचा दिवस ठरला.स़ोबत जोडुन शनिवारी व रविवारी सुट्टी होतीच.पण गडावर जाण्यासाठी आम्ही वाट निवडली ती मुरबाड तालुक्यातील वालीवरे गावातुन जाणारी थरारक अशी नळीची वाट.शुक्रवारी सकाळी ६वाजता योगेश व मी कल्याण एसटी स्थानकात भेटलो.बसस्थानकातुन बोरिवली-अहमदनगर ही बस पकडली.
बस ६.३०ला सथानकातुन निघाली.८.४०च्या सुमारास आम्ही सावरणे ह्या गावात उतरलो.सावरणे हे कल्याण-नगर या महामार्गाशेजारी माळशेज घाटाच्या सुरवातीलाच निसर्गाच्याकुशीत वसलेलछोटंसं व सुटसुटीत गाव.
सावरणे गावात उतरल्यावर आजुबाजुच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा लक्षवेधुन घेत होत्या.त्या न्याहाळत आम्ही सावरणे तुन वालीवरेकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता पकडला.हया रस्त्याने चालताना निरव शांततेचा आनंद मिळत होता व वाट रमणीय होती.पुढे काही अंतर चालत गेल्यावर डांबरी रस्तावरून गवतातील पायवाटेने डाव वळण घेऊन काही अंतरावर घरांची वस्ती लागली.इथुनपुढे जंगलातुन जाणारी पायवाट सुरु झाली.या पायवाटेने उजव्या हाताला वळुन पुढे छोटा चढाई करून वर खिंडीचा टप्पा लागला.ती खिंड पार करून खाली आल्यावर मोकळ्या शेतातुन चालत काही अंतर चालत जाऊन आम्ही वालीवरे गावात पोहोचलो.
वालीवरे तसे छोटसच गाव.वालीवरे गावात नळीची वाट विचारून वाटेला लागलो.पण दुर्देवाने पुढे काही अंतरावर ज़गलातील पायवाटेने चकवा दिल्याने आम्ही वाट चुकलो व भरकटलो.यात दीड तास वाया गेले.शेवटी काही माणसांचा आवाज ऐकु आल्यावर आवाज देऊन नळीची पायवाट पकडली.एव्हाना १२.३०वाजले होते.शेवटी उशीराने का होईना पायवाट मिळाली याचा आनंद झाला.पण उन्ह वाढत गेल्याने घळीतुने वर जाताना त्रास जाणवु लागला.सुरूवातील छोट्या-छोट्या दगडांतुन जाताना जसजसे वर जाऊ तसे दगड मोठे मोठ्या दगडांचे टप्पे लागले.ते टप्पे पार करताना थरारक अनुभव येत होता व आमची कसोटीतही लागत होती.संपुर्ण घळी दगडांनी व्यापलेली आहे.उन्हामुळे आमची चाल बरीच मंद झाली.धाप लागु लागली.आम्ही अधुनमधुन विश्रांती घेत वर जात होतो.शेवटी मजलदरमजल करत आम्ही नाळेच्या मुख्यतः व खड्या चढणीच्या टप्प्यावर आलो.समोर खडीनाळ पासुन डोळे विस्फारले.व नाळेच्या वाटेचा अप्रुप वाटल.
सोबत काही मंडळीही वर जाणारी मागुन आली.खडया शाळेचे हे टप्पे पार करताना कौशल्य पणाला रागल.पण आम्ही दोघेही मुरलेले भटके असल्याने दगडांचा आधार घेत ते टप्पे पार करून वर गेले.लागोपाठ असे उभ्या चढाईचे दोन तीन टप्पे पार करताना कसं लागले.उभ्खाली पाहिलं तर दरी खोल व भयाण दिसत होती.सहयाद्रीच्या कडयांच भेदक रूप आम्हाला अनुभवायला मिळालं होत.या सरळसोट कातळकडयातील अरूंद खडकाचे हे टप्पे पार करणे खुपच थराराक होत.हे सर्व टप्पे पार करून ४.४५ला आम्ही घळी पार करून नळीच्यामाथ्यावर आलो
.समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा रौद्र रूप धारण करून उभ्या होत्या.पुन्हा चढाईची दोन टप्पे पार करून ६.१५ला आम्ही कोकणकडयाजवळ पोहोचलो.समोर कोकणकडयाची घळी भव्यदिव्य दिसत होती.ती घळी पासुन डोळे विस्फारले.
सुर्यास्ताची वेळ झाली होती.आकाशात तांबुस सोनेरी रंगाची उधळण झाली होती.तो नजारा खुपचं सुंदर व मनमोहक होता.कोकणकडयावरचा तो सुर्यास्त डोळयाच पारणं फेडणारा होता.आजची भटकंती सार्थक झाल्याच समाधान चेहर्यावर होत.एका टपरीवर चहा घेतला.
व सुर्यास्त पासुन आम्ही हरिचंद्रेश्वराच्या मंदीराकडे निघालो.६.४५च्या सूमारास आम्ही मंदीराजवळ पोहोचलो.महाशिवरात्र असल्याने मंदीर भाविकांनी गजबजल होत.अंधार पडायला सुरूवात झाली.आम्ही गडावरतीच मुक्काम करायचा ठरवलं.गडावर वीज नसल्याने सोलार वर चालणारे बल्बने रोशनाई पसरली होती.असो.एका घरगुती हाटेलवजा राहुटीबाहेर आम्ही मुक्काम ठोकला.तत्पुर्वी चुल पेटवुन टोपात मैगी शिजवुन खाल्ली.ती मंगी खुपचं चवदार लागली.महाशिवरात्रीमुळे गडावर माणसांची रेलचेल असल्याने असल्यामुळे जत्रेच स्वरूप आलं होतं.मंगी खाल्लीतरी पोटात कावळे ओरडतच होते.त्यामुळे आम्ही पिठलभाकरची आंर्डर दिली.ते जेवण खुपचं चवदार लागलं.जेवण झाल्यावर दिवसभराच्या थकल्यामुळे लवकरच अंधरुण टाकुन घेतलं.दुर्दैवाने मी आणलेली पावरबंक बंद पडली होती व दोघांच्याही फोनची बॅटरी उतरल्याने फोन बंद पडले होते.शूवटी तिथेच मुक्काम केलेल्या ग्रुपमधील एका सज्जन गृहस्थांनी पावरबक दिल्याने निभावल.असो.रात्री बाहेर अंगणात झोपण्याची ही पहिलीच वेळ होती.पण तो अनुभव व आनंद अविसमरणीय होता.दुसरया दिवशी पहाटे उठुन हाततोंड धुवुन चहा घेऊन आम्ही तारामती शिखराकडे निघालो.२५मिनीटांत आम्ही तारामती शिखरावर पोहोचलो
.शिखर पाहुन खाली उतरून आलो.हरिश्चंद्रेश्वराच सुंदर मंदीर पाहिलं.
वरच्या बाजुला कातळात खोदलेल्या लेण्या पाहिल्या.
सप्ततीर्थ पुष्करणीच तीर्थस्थळ पाहिल.
मंदीराच्या थोड खाली असलेली केदारेश्वराची . गुफा पाहिली.
हरिश्चद्रगडावरील हा सुंदर खजिना पाहुन हरिश्र्चंद्रगडाच्या निरोप घेऊन कोकणकड्याच्या बाजु ने चालत आम्ही पुन्हा नळीच्यावाटेच्या तोंडाजवळ येऊन ठेपलो.खरतर इथुन निघायची ईच्छा नव्हती पण नाईलाजाने परतीची वाट धरली.इथुन उजवीकडे जाणारी स्पष्ट पाऊलवाट झाडीतुन पकडुन आमृही चालु लागलो.काही मिनीटात आम्ही सपाटीवर येऊन ठेपलो.इथुन पायवाट मोकळ्या पठारावर गुडुप झाली.त्यामुळे आम्ही चिंतीत झालो.सुदैवाने समोर काही अंतरावर गवाताची गंजी दिसली.पुढे चालत गेल्यावर आडोश्याला झाप आढळलं.जवळ जाऊन आम्ही घरात आवाज दिला.तेव्हा एक व्यक्ती बाहेर आली.ती होती साहेबराव बोटे.आम्ही त्यांना सादडे घाटाची वाट विचारली.त्यांनी काही अंतर सोबत येऊन दाखवुन दिली व पुढे कसं जायचं ते समजावुन सांगितल.आम्ही त्यांचे आभार मानुन सरळ पाऊलवाटेने चालायला लागलो.सुरूवातीच्या सपाट चालीनंतर चढ लागला.अवघ्या पंधरा मिनीटात चढाई करून आम्ही सादडे घाटाच्या तोंडाशी आलो.सादडे घाटाची ती घळ पाहु न आम्ही चकीतच झालो.
थोडक्यात काय तर एका वेगळ्या वाटेचा थरार अनुभवायला मिळणार हा आनंद आम्हाला झाला होता.आम्ही घळ उतरायला सुरूवात केली.दगडातुन असलेली सादडे घाटाची वाट नंतर बाजुने बरीच वळणे घेत उतरत गेली.
दुपारच उन्ह वाढलं तसा उन्हाच्या झळा जाणवु लागल्या.पण उतार असल्याने तितकासा त्रास जाणवला नाही.शेवटीमजलदरमजल करत आम्ही घाट उतरून सपाटीला आलो.
पुढे काही अंतर चालत गेल्यावर केळेवाडी गावाजवळ येऊन ठेपलो.
एव्हाना घड्याळात एक वाजले होते.गावात कुणाची बाईक मोरोशीपर्येंत सोडण्यासाठी मिळते का याचा आम्ही शोध घेऊ लागलो.पण मदत करणार लवकर कुणी सापडेना.शेवटी एक दादा विटांच काम चालु असताना काम सोडुन आम्हाला २किमीवरील वालीवरेपर्युंत सोडण्यास तयार झाले.वालीवरेत त्यांनि आम्हाला एका घराजवळ सोडल्यावर तिथे घरी जेवणाचा आम्हाला आग्रह झाला.तिथेच घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही बाईकस्वाराचा शोध घेऊ लागलो.एका तरूणाला भाड देऊन येण्यास तयार केलं.त्याने आम्हाला मोरोशीपर्यूंत मुख्यतः रस्त्यावर सोडलं.मोरोशीला आल्यावर कल्याणकडे जाणारी एसटी पकडली.मी मुरबाडला उतरून पुढे मुरबाड-बदलापुर बस पकडुन४.१५ घरी पोहोचलो.अश्याप्रकारे हरिश्चंद्रगडाची दोन दिवसांची थरारक भटकंती सुखरूपपणे पार पडली.😊