भिवपुरी गाव(कर्जत)-खांडी घाट-कुसुर (मावळ)कुसुर घाट- कांब्रे लेणी.


राम राम मंडळी.आज पुन्हा एक रविवार.सट्टीचा दिवस.पण सुट्टीचा दिवस म्हटला कि आमच्यासारख्या भटक्यांची पावले वळतात नवीन ठिकाणांच्या शोधात.मागच्यावेळेस वाट चुकल्यामुळे कुसुर घाट व वेळेअभावी खांडीघाट अपुरा राहिला होता.ती खंत मनात होतीच.तो अर्धवट राहिलेला ट्रेक या रविवारी मी  योगेश खोपकर सोबत पुर्ण केला.पण भटकंतीचा प्रवास इतका काही सोपा नसतो.भटकंती करताना अनेक घटना व प्रसंग घडतात.वेगवेगळे अनुभव येतात.एखाद्या कथेप्रमाणेच.तीच कहाणी मी इथे सविस्तरपणे वाचकांच्या पुढे मांडणार आहे.मला आशा आहे तुम्हीही ती वाचायला उत्सुक असाल.तेव्हा शेवटपर्येंत ही पोस्ट नीटपणे वाचा तेव्हा सर्व घटनांचा  उलगडा होईल.तर हया रविवारी मी  खोपकर दोघांनी भिवपुरीगावातुन खांडी घाटाने वर जायचं व कुसुर घाटाने खाली उतरून  परत भिवपुरीलायायच असं ठरवल होतं.पण त्याचसोबत मी ऐनवेळी कांब्रेच्या लेण्या पाहायला जायचा बेत यात जोडला.पण योगेशला ते आदल्यादिवशी मी सांगितल नव्हतं.सकाळी ७.१५ला कर्जत स्टेशबाहेर भेटायचं ठरवलं.योगेश त्याची अंक्टीवा घेऊन पनवेल चौकमार्गे कर्जतला येऊन मला भेटणार होता.रविवारी पहाटे ६.६मिनीटांनी योगेशने घरुन निघाल्याचा फोन केला.मी बदलापुरहुन ६.३४ची कर्जत लोकल पकडली व कर्जतला उतरला.पुढे योगेशला फोन करून मी श्रीरामपुलावर भेटेन असं सांगितलं.योगेशला यायला वेळ असल्याने मी श्रीरामपुलापर्यंत चालत गेलो व पुलाजवळ पोहोचल्यावर योगेश च्या येण्याची वाट पाहु लागलो.योगेश साधारण ७.४५ ला श्रीरामपुलावर पोहोचला.पुढे नाश्ता करायला मिळणार नाही हे लक्षात घेऊन त्याने अंक्टीवा बाजुला लावली व खोतवडेवालेच्या छोट्या हांटेलात दोघांनीही नाश्ता करून चहा घेतला.नाश्तापाणी झाल्यावर  चटकन अक्टीवाववर बसुन दोघेही कडावच्यादिशेने दुचाकीवर बसुन निघालो.कडाव हे कर्जतपासुन साधारण ७किमी अंतरावर वसलेले मुख्यतः गाव.पण गाव येण्याच्याआधी काहीअंतरावर उजव्याहातावरुन रस्ता भिवपुरी गावाकडे जातो.कडावपर्यंत रस्त्याच काम चालु असल्याने व जागोजागी खड्डे पडलेले असल्याने गाडी सांभाळुन चालवावी लागत होती.ही कसरत करून कडाव जवळ येताच भिवपुरी गावाकडे जाणारया रस्त्याने अंक्टीवा काढली.रस्ता सुरुवातीला चांगला होता पण नंतर जागोजागी खड्डे पडले होते.कडाववरून भिवपुरी हे गाव ९किमीवर आहे.रस्ता सरळ असल्याने झटपट अंतर पार करुन आम्ही टाटा पावरहाऊसच्या बाहेरील गेटवर येऊन पोहोचलो व गाडी आत जाऊ देण्याची मागणी केली.तेव्हा वांचमनने एका अधिकारयाला फोन केला.तो आल्यावर मुख्यतः अधिकार्यांची बोलणी झाल्यावर आत जाण्याची व गाडी लावण्याची परवानगी मिळाली.यात काही मिनीटे वाया गेली.पुढे अंक्टीवा आत नेऊन कंण्टीनच्या शेडखाली लावली.इथुन  पुढे सरळ काही अंतर चालल्यावर डाव्या हाताला खांडीकडे जाणारी पायवाट धरली.एव्हाना घड्याळात ९.३०वाजले होते.पायवाट मळलेली होती.ती हळुहळू वर जात होती.सुरुवातीला पावरप्लान्टला समांतर जाणारी पायवाट वर गेल्यावर डावीकडे वळाली.
यापुढे पायवाटेच्या दोन्हीबाजुला झाडी व कारवी होती.

साधारणपणे तासाभराने १०.३०च्यासुमारास संपुर्ण चढाई पार करून वर डांबरी सडक लागली तेव्हा दोघांनाही इतक्या लवकर चढाई संपल्याचे आश्र्चर्य वाटलं व वर  आनंदही झाला
.यापुढे आम्हाला कुसुरकडे जाणारी वाट पकडायची होती.पुढे कुठल्यादिशेला कुसुर आहे  या संभ्रमात असताना एक चारचाकी येताना दिसली.तीला हात केलं तेव्हा गाडीतील व्यक्तीने कांडी ह्या पांईटपासुन ४ते ५किमीअसुन तिथुनपुढे कुसुर ३ते४किमी असावं हे सांगितलं तेव्हा आमच्या आनंदावर विरजण पडलं.कारण तितकं अंतर चालत जावं लागलं असतं व त्यात श्रम व खुप वेळ खर्च झाला असता.आम्ही जिथे उभा होतो तो रस्ता टाटांच्या खाजगी मालकीच्या असल्याने दुसरी वाहनेही मिळण शक्य नव्हतं.असो.दोघांनी गाडीवाल्याने सांगितलेल्या दिशेची डांबरी सडक पकडली व चालायला सुरुवात केली.वाट निर्मनुष्य होती व चालताना वेगळाच आनंद मिळत होता.सुदैवाने काही अंतर चालत केल्यावर  पावरप्लानच्या कामाची महिंद्रागाडी मागुन येताना दिसली.आम्ही तिला हात केला.गाडीतील दादांनी आम्हाला खांडीफाट्यापर्यंत सोडण्यात तयार झाले.आमच्यासाठी हा सुटकेचा व आनंदाचा क्षण होता.कारण आमचा बहुमुल्य वेळ व श्रम वाचणार होते.खांडीपांईटपासुन खांडीफाट्यापर्यतच अंदाजे ४किमीच अंतर झटपट पार करत  आम्हालाफाट्यापर्यंत सोडल व याबद्दल भागही घेतला नाही.आम्ही सरळ खांडीगावाकडे चालु लागलो.साधारण दीड किमी अंतरावरील कांडी गावात पोहोचलो तेव्हा ११वाजले होते.
खांडीतुन कुसुरकडे जाणारी बस थोड्याचवेळापुर्वी निघुन गेल्याच कळलं व दुसरं प्रवाशी साधन लवकर मिळणार नाही याची खात्री पटल्यावर कांडी पासुन पुढे ४ते५किमी अंतरावर असलेल्या कुसुरगावापर्यंत चालत जायचं ठरलं.खांडीपासुनपुढे रस्त्याच्या डाव्याबाजूने ठोकळवाडी धरणाचे विस्तीर्ण जलाशय पसरले होते व छान थंड हवाही सुटली होती.धरणाच पाणी व पसारा पाहुन डोळयांच पारणं फिटलं.
आजुबाजुच्या परिसरही नयनरम्य होता.मावळच्या त्या शांत परिसराने मनाला भुरळ घातली होती.दोघांनी रस्त्याने चालायच ठरवलं.पाठीमागुन एक दोन बाईकस्वार आले पण कुणी थांबला नाही.पाठीमागुन दुसरी गाडीही आली नाही.साधारण सव्वातासाची तंगडतोड केल्यावर कुसुरगावाखाली बांधलेला ऐतिहासिक तलाव लागला.पण नक्की तोच हा तलाव आहे  हे का हे आम्हाला माहित नव्हतं.तेव्हा थोडपुढे खाली रस्ता उतरताना एक शेतकरी बाबा दिसले.त्यांच्याकडुन तोच प्राचीन तलाव असल्याची पुष्टी केल्यावर चेहरयावर आनंदाची छटा उमटली.पुढे काही अंतर चालत गेल्यावर कुसुर हे शांत व  छोटेखानी गाव लागल.गावातुन पाठीमागे कुसुर घाटाने उतरणारी  पायवाट आहे हे विचारपुस करून त्यावर शिक्कामोर्तब केलं.पण आम्ही कुसुर घाट लगेच उतरणार नव्हतो तर कुसुरपासुन कान्हाफाटाच्यादिशेने साधारण ७किमी अंतरावर असलेल्या कांब्रेच्या लेणी पाहुन नंतर कुसुरला येऊन घाटाने उतरायचा ठरल.ऐव्हाना घड्याळात १२.२०झाले होते व आम्ही कांब्रेगावाकडे जाणार काही प्रवासी साधन मिळेल का याची वाट पाहु लागलो.साधारणपणे १२.३५च्या सुमारास एक डंपर आम्हाला येताना दिसला.तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.आम्ही डंपरचालकाला हात केला.त्याने डंपर थांबवला.डंपरमध्ये दोघेही बसलो व आमचा प्रवास कांब्रेच्या दिशेने सुरू झाला.दोघांच्याही मनात कांब्रेच्या लेणीला भेट दयायची उत्सुकता होती.अवघ्या पंधरा मिनीटात आम्ही कांब्रे गावात पोहोचलो.
डंपरचालक दादांना भाडयाचे पैसै दिले व आभार मानुन खाली उतरलो.गावातच उतरल्यावर रसत्याच्याकडेला सह्याद्री प्रतिष्ठाणतर्फे लेण्यांचा मार्गफलक लावला आहे त्यामुळे आमचं काम सोपं झालं होतं.
गावातुन कांक्रीटचीवाट सोडुन वर गेल्यास पाऊलवाट लेण्यांकडे जाते.लेण्या कांब्रेगावापासुन जवळच वरच्याबाजुवरील  डोंगररांगेत आहे.
सुरूवातीला पायवाट मळलेली होती पुढे ती झाडीत गेली व तिला फाटे फुटले.आम्हाला वाटेचा योग्य अंदाज आला नाही व उजवीकडुन वर चढुन वर गेल्यावर डावीकडे दगडीटप्प्यखवर येऊन अडकलो.वर लेणी दिसत नव्हती.तेव्हा खाली उतरून आलो व उजव्या हाताची पायवाट चालत गेल्यावर लेण्यांकडे जाणारी मळलेली पाऊलवाट दिसली तेव्हा हायस वाटलं.पण यात वीस मिनीटे वाया गेलो.वाटेने वर चढुन गेल्यावर सरळ चढ असलेला कातळटप्पा लागला.खोबण्यांचा आसरा घेऊन तो पार करून झटकन लेण्याजवळ पोहोचलो तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.कांब्रेच्या लेण्या हया अर्धवट काम करून सोडुन दिलेल्या लेण्या आहेत.सुरूवातीलाच दोन कोरडे मातीने भरलेलेे टाके लागले.पुढे दोन खोलवर खोदलेले टाके आढळले.पुढे मुख्य लेेणीत आम्ही आलो.

लेणीत मोठी विहारसदृश्य रचना होती.लेण्या पाहुन आम्ही आनंदीत झालो होतो पण वेळेअभावी झटपट फोटो व चलचित्रण करुन लवकर खाली उतरायचं ठरवलं.कारण आम्हाला कुसुर गाव गाठुन तिथुन घाटही उतरायचा होता.साधारण २.९च्या सुमारास आम्ही खाली उतरायला सूरूवात केली व पंधरा मिनीटात खाली उतरलो.गावात एके घरी पाणी पिऊन तहान भागवली व बाटलीही भरून घेतली.ज्यांनी पाणी दिलं त्यांचं आभार मानुन मुख्य डांबरी  रस्त्यावर येऊन कुसुरकडे जाणारी काही वाहन मिळत का याची वाट पाहु लागलो.येव्हाना २.३०वाजले होते.साधारण पंधरा मिनीटांनी कुसुरला जाणारी जीप आली .ती पकडली व आमचा प्रवास कुसुरकडे सुरू झालो.तीन वाजुन गेले होते तेव्हा आम्ही कुसुरला पोहोचलो.गाडीतुन उतरल्यावर लगबगीने गावातुन कुसुरघाटाकडे जाणारी एका मावशीला विचारली.तिने व्यवस्थित वाट समजावली व आम्ही कुसुरकडे चालायला सुरूवात केली.सुरूवातीला मोकळ्या पठारावर वाट पुढे उजव्या हाताला उतरते व थेट भिवपुरी गावात जाते.वाट चांगली मळलेली आहे.पठारावर एक म्हातारे शेतकरीबाबा म्हशी चरायला घेऊन आले  होते.त्यांनी वाट व्यवस्थित. समजावुन सांगितली तीही आम्हाला पायवाट समजली व दिसली नाही व आम्ही चुकीची वाट पकडुन चालत राहिलो तेव्हा त्यांनी आवाज देऊन खाणाखुणा धनी वाटेची दिशा दाखवली.
आम्ही मागे उजवीकडे गवतखतुन खाली उतरणारी वाट सोडली होती.ती मागे फिरुन परत पकडली व बाबांचे पुन्हा आभार मानुन उतरायला सुरुवात केली.तेव्हा घड्याळात ३.१०वाजले होते.योग्य वाट मिळाल्याचा आम्हाला आनंद होता.वाट स्पष्ट व नीट  उतारत जाणारी होती.आम्ही झटपट वाट उतरायला सुरूवात केली.खाली काही अंतर आल्यावर कुसुरच विस्तीर्ण पठार दिसु लागले.
पुढे वाटेत उतरताना काही अंतरावर कुसुरकडे जाणारी  दिसली.तिला पाण्याच्याटाक्य्यांची जागा विचारली.तिने त्या खाली काही अंतरावर आहेत हे सांगितल्यावर आमचा उत्साह वाढलि.पुढे तीव्र उताराची कुसुर घाटाची सोंड उतरून आम्ही सपाटीला आलो.इथे उजव्या हाताला पाण्यखच्या चार टाक्या एका रांगेत खोदलेल्या आढल्या.
टाक्या पासुन आम्ही आनंदीत झालो.प्राचीनकाळी कुसुरघाटातुन वाहतुक होतं असे.तेव्हा घाटातुन जाणारया प्रवाश्यांची तहान भागविण्यासाठी या टाक्या खोदण्यात आलेल्या होत्या.टाक्यांचे फोटो काढुनी आम्ही मुख्यतः पायवाट धरून उतरू लागले.जवळच एक सत्तरीतील आजोबा गवत कापताना दिसले.
त्यांच्याशी काही जुजबी गप्पा केल्या.तेव्हा ते कुसुरच्याबाजुला असलेल्या मोरमाडीगावातील असल्याचं कळलं.त्यांचा उत्साह पासुन आम्ही दोघेही चकीत झालो.कुसुर घाट व्हायला हवा होता ही खंतही त्यांनी बोलुन दाखविली.त्यांनी त्यांच्याकाही व्यथाही बोलुन दाखविली.तेव्हा आम्हाला वाईटही वाटलं.बाबांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा घाटवाटा उतरायला सुरूवात केली.शेवटी ४.३०वाजता दोघेही घाट उतरून भिवपुरी गावात पोहोचलो.पुढे गावातील ऐतिहासिक अष्टकोणी तलाव पाहुन पावरप्लान्टच्यादिशेने निघालो कारण योगूशची अंक्टीवा आत होती.
भिवपुरी गावातुन साधारण  दीड किमीवर प्लान्ट आहे.आम्ही मुख्यतः सडकेने चिरत जाऊन बाहेरील गेटवर पोहोचलो.तिथुन मेनगेटवर पोहोचुन कंन्टीच्यखशेडखाली लावलेली दुचाकी बाहेर काढली व कडावकडे जाणारा रस्ता पकडला.आलो त्यांचं रस्त्याने परत फिरून आम्ही श्रीरामपुल गाठल.पुन्हा थोडा नाश्ता केला.योगेशने मला कर्जत स्टेशनजवळ सोडलं व पुढील प्रवासासाठी निघुन गेला.मी ६.४३ची कर्जतहुन  सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडुन बदलापुरला उतरलो व नंतर घर गाठलं.आजच्या दिवसाची भटकंती व्यवस्थित पार पडल्याचे समाधान चेहरयावर होत.याच श्रेय योगेशला जात.कारण त्याने दुचाकी आणली नसती तर हा ट्रेक वेळेपुर्ण करणं शक्य झालं नसत.त्याबद्दल त्यांचं मनापासुन आभार.मागच्यावेळीस अर्धवट राहिलेला खांडी व कुसुरघाटाचा ट्रेक यावेळी व्यवस्थित व वेळेवर पार पडला होता.यावेळेस आंध्र मावळचा भुभागही पाहायला मिळाला.सोबत अनपेक्षितपणे न ठरवलेल्या कांब्रेच्या प्राचीन लेण्याही पाहायला मिळाल्याचा समाधान होताच.तर मंडळी आजच्या भटकंतीला इथेच पुर्णविराम देत आहे.पुन्हा भेटु नवी भटकंती व अनुभव घेऊन.तोपर्यंत रामराम.🙏🙏

Comments