(वाघाचीवाडी,मुरबाड)-डोणीचे दार/त्रिगुणधारा घाट-दुर्ग-खुटेदरा/खुट्टा घाट-रामपुर

राम राम मंडळी
आज काय रविवार म्हणजे सुट्टीचा.आराम करायचा दिवस.बरोबर ना?तुम्ही म्हणाल आराम नाहीतर दुसरं  काय करायचं? हप्त्यातून एकच तर दिवस मिळतो सुट्टीचा.बरोबर आहे.मग तुम्ही मला विचारलं तूही आरामच केला असणार?दुसरं काय करणार?तर मंडळी राग मानू नका.सांगायचं उद्देश हाच की भटक्यांसाठी सुट्टी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत  करण्याचा व भटकंतीसाठी सवडीचा एक निवांत दिवस ठरतो.इतका स गळा उहापोह करण्याऐवजी मी हे सांगुनच टाकतो की आज मी फिरायला गेलो होतो?कुठे?तेचतर सविस्तरपणे सांगणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत  ही पोस्ट नीट वाचा.त्याच काय झालं की मागच्या वेळेस मी व योगेश दोघांनी मिळून खुटेदरा घाट पार केला होता.पण उतरताना दोघेही  दार्याघाटाने उतरलो होतो .तेव्हापासून खुटेदरा घाट उतरायचं राहून गेला ही खंत दोघांच्याही मनात राहून गेली होती. सोबतच बरेच दिवसांपासून वाचनात  आलेला  खुतेदरा घाटाच्या बाजूलाच डोंगर रांगेत असलेला त्रिगुंधरा  घाटाचा विषय मनात घोळत होता.तेव्हा विचार करून त्रिगुंधारा घाटाने वर जायचं व खुटेदरांघाटाने उताराचा असा बेत मी व योगेशने ठरवला होता.दिवस निवडला होता तो रविवारचा.प्रवासाचा मार्ग होता कल्याण धसई व पुढे मढ गावच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या वाघाचीवाडी हे त्रिगुंधरा घाटच्या पायथ्याचे गाव गाठायच.योगेश त्याची बाईक किवा अक्टीवा गाडी घेऊन मुंबईवरून सकाळी ५.३०ला मला कल्याण एस्टी स्टँडजवळ  भेटणार असं ठरल होत.व पुढे बाईकवर पुढे वाघाचिवडी गाठायचे असा बेत ठरला. तिथून पुढे त्रिगंधराघाट  जो माध्यावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डोणी गावाला जोडत असल्याने डोणीनीच दार म्हणूनही ओळखला जातो तो सकाळी पार करून वर डोणीगावात  पोहोचायच व पुढे पायपीट करुन दुर्ग व नंतर खुटेदराघाटाने उतरुन रामपुरला पोहोचायच अस ठरला होतां.नेहमीप्रमाणे योगेश सोबततर होताच पण यावेळेस एक सहकारी इंद्रणीलने आग्रह केल्यामुळे त्यालाही सोबत घ्यायच ठरल.नेहमीप्रमाणे मी रविवारी  सकाळी ५.१ची सीएसएमटी लोकल पकडून कल्याण स्टँडजवळ आलो.तोपर्यंत योगेश व इंद्रनील दोघेही अॅक्टीवर येऊन थांबले होते.दोघांनाचीही गाठ घेतल्यावर तत्काळ भल्यापहाटे अॅक्टिवा मुरबाडच्या दिशेने काढली.पहाटेच्या  वातावरणात बोचरी थंडी जाणवत होती.योगेश नेहमीप्रमाणे गाडी चालवण्यात तरबेज असल्याने गाडी व्यवस्थित चालवत होता व दोघेही निश्चिंतपणे सांभाळून बसलो होतो.पहाटे ६.२५च्या सुमारास कल्याण ते मुरबाड हे २८किमीच अंतर झटपट पार करीत गाठल.मुरबाड मध्ये एका नेहमीच्या टपरीवर सकाळी पोटपूजा केली व थोड्याच वेळात अॅक्टीवा उमरोलीच्या दिशेने काढली.मुरबखडपासुन २०एक किमी अंतरावर असलेल उमरोलीवरून उजव्या हाताला वळून धसईकडे जाणारी रस्ता धरायचा होता.रस्तात वाहतुक तुरळक असल्याने हे अंतर लवकर कापत तिघेही वाघाची वाढीकडे निघालो. ह्या ट्रेकसाठी कमालीची  उत्सुक होतीे.कोकणातून वर घाटध्यावर जाणाऱ्या वाटा हा माझा आवडीचा व  आकर्षणाचा विषय असल्याने मी ह्या ट्रेकची प्लॅन योगेशसोबत सलामसलत करून ठरवला होता.दिलेली वेळ तो कधीच चुकवत नाही व ट्रेकसाठी तो नेहमी उत्सुकचा असतो हे विशेष.असो उमरोलीतून धसई गाठून नंतर मढ गावात पोहोचल्यावर  वाघाचीवाडीची वाट विचारून गावात ७.४५च्या सुमारास आम्ही पोहोचलो. अक्टिवा एका घरासमोर पार्क करून त्रिगुणधरा घटाकडे जाणारी पायवाट विचारून चालायला सुरुवात केली.वाघाचीवाडी हे मोजकीच कुडाची घर असलेली वाडी आहे
.पायवाट चालत आम्ही कोरड्या पाण्याजवळ पोहोचलो.पुढे  पात्राशेजारुन वर जाणारी पायवाट धरली पण ती पुन्हा नदीपात्रात येऊन ठेपली.पात्रात भलेमोठे खडक आडवेतिडवे पसरले होते.मध्येच खड्डेही होतेच.साधारणपणे गावातुन आम्ही ७
५६ला निघालो होतो व नदीपात्रातुन वर  चढाईस ८.१५ लासुरुवात केली होती.
वर काही अंतरावर हरवलेल्या शेळ्या शोधणारे शेतकरी दिसले.त्यांनी सरळ वर जाण्यास सांगितले व नदीपात्रातील मोठमोठे खडक पार करत आम्ही वर जाऊ लागलो.आम्ही बाजुने जाणारी वाट कुठे सापडेल का याचा शोध घेत होतो.पण वाट काही सापडत नव्हती.सकाळी नजरेसमोर दिसणारा घाटजवळ व सोपा वाटतो होता पण प्रत्यकक्षात तो दमछाक करणारा व आमची परि
क्षा घेणारा ठरला.सुरुवातीचा वेग नंतर मंद होऊ लागला होता.कोरड्यानदी पात्राच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी व उंच सुळके होते त्यामुळे त्यातून वाट असण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे तिघांनी एकत्र विचार करुन कोरड्या नदीचे पात्र पकडून सरळ वर जायचं ठरवल.पण वाटत भले मोठे खडक पर करताना कधी डावीकडे तर कधी उजवीकडून वर जावे लागत होते.त्यातून मध्येच घळीही लागत होती.खडकांना पकगडायला व्यवस्थित जागा नसल्याचे सरळ वर चढता येत नव्हतं व अडवतिडव चालून वर जाव लागत होत.
खडकांनी व्यापलेली दरी आमची परीक्षा पाहत होता वती पार करताना वेळ झरझर निघून जात होता.मजल दरमजल करत खडकांचे टप्पे पार करत वर जाताना दमछाक होत होती व पायांचा सणसणीत व्यायामही होता होता.सुदैवाने उन्ह लागत नव्हता त्यामुळे जास्त त्रास होत नव्हता.जागोजागी खडकातील पाण्याचे झरे लागत होते.त्यातील गार व स्वच्छ पाणी पिऊन तहान भागवत व काही ठिकाणी विश्रांती करत आम्ही वर चढाईकरत होतो.आमच्या अंदाजापेक्षही त्रिगुणधाराघाट अधिक वेळखाऊ,कष्टदायक व आमची खडतर परीक्षा पाहणारा निघाला.मधूनच वाटेविषयी आम्हाला शंका निर्माण होत होती.पण दोन्ही बाजूला असलेली उभे सुळके व मध्ये खोल दरी यामुळे  दरीच्याकडेने वाट असेल का याविषयी आमच्या मनात शंकाहोती.सकाळी सुरुवात करताना असलेला जोश व उर्जा कमी झाली होती.खडकपार करुन वर चढताना खुपचं तारेवरची ही कसरत करावी लागत होती.व वेळ भराभर निघून जात होता.तरीही आम्ही हिम्मत न हारता वर चालतच रहायच ठरवल.सकाळी ८.१५ल सुरू केला ट्रेक घड्याळात ११वाजून गेले तरीही संपेना.वेळ जात होती तशी मनात शका व दडपण वाढत होती.समोर दिसणारा टोक पाहिल की हा  दरीचाटप्पा लवकरच पुढे संपेल ह्या आशेवर आम्ही चालत होतो.पावलांचा वेगही मंद होता कारण प्रत्येक पावलावर मोठमोठे खडक स्वागतासाठी आ वाहुन उभे होते.त्रिगुणधरा घाट पाहिल्यावर योगेश व मला दारयाघाटाची आठवण झाली पण त्या घाटात निदान खडक एकसमान उंचीवर असल्याने व पाऊल ठेवायला ब-यापैकी जागा असल्याने झटपट उतरता आल होत.पण ट्रिगुंधरा घाटाची गोष्ट वेगळीच.असो.११चे नंतर १२वाजले.पात्रातुन बाजूने चालताना दोन-तीन ठीक वाटही चुकलो.पण परत कारवीतून पात्रात उतरून आल्यावर कडेने जाणाऱ्या वाटेवर विश्वास न ठेवता नदीपात्रातूनचशेवटपर्यंत वर चालायचं ठरवला व त्याचप्रमाणे खडकांची झुंज देत धापा टाकत तिघेही वर चढू लागलो.सुदैवाने एका वरच्या टप्प्यावर मळलेली पायवाट सापडली व तीच पकडून वर जाऊ लागलो.शेवटचा टप्पा जवळ आला तोपर्यंत बराच धकवा जाणवत होता.वेष निघुन जात होती.
शेवटी वरच्या टप्प्यात पायवाट कारवीतून वर जाऊ लागली.ह्य वाटेने वीसएक मिनिटात आम्हीत्रिगुणधरा घाटाचा माथा गाठला तोपर्यंत घडल्यात १२.४०वाजले होते.जवळजवळ साडेचार ताशांच्या चढाईनंतर आम्ही वर माध्यावर पोहोचलो होतो.
आमच्यासाठी हा आनंदाचा व विजयाचा ‌ होता.खाली पाहिल्यावर त्रिगुणधराघाटाची दरी धडकी भरवणारी होती.आता पुढच आमच लक्ष
होतं डोणी गाव गाठणं.तेव्हा वेळ न दवडता माध्यावरुन आम्हीपुढची वाट पकडली.आम्ही काही पावले पुढे आल्यावर कोरड्या पात्रात वाट हरवली.तेव्हा वाटेविषयी शंका निर्माण झाली असता योगेशने सुरुवातीलाच डाव्या हाताला वर जाणारी पायवाट हेरली होती तिची जाणीव करुन दिली.मागे वळुन ती पायवाट धरली व आम्ही डोणीच्यादिशेने निघालो.वाट सोपी व स्पष्ट होती. पुढेकाही अंतरावर सपाटीला गावच्या वाडीतील महिला दिसली.त्या महिलेला डोणी गावाची वाट विचारुन तिघेही निश्चिंतपणे चालू लागलो.साधारण अर्ध्या तासात डोनी ह्या छोट्या गावत १.१५च्या सुमारास आम्ही पोहोचलो.डोनीत पोहोचल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास
सोडला कारण पाच तासांनी गाव लागले  होतं व ट्रेकचा एक टप्पा आम्ही यशस्वीपणे पार केला  होता.डोनी गावात एके ठिकाणी एके घरात मावशी दिसल्या.त्या होत्या गवारी मावशी.

योगेशने त्यांना चहासाठी विनंती केली.मावशीनेही तत्काळ होकार देऊन लगबगीने चहा बनवायला गेल्या पण त्याआधी त्यांनी आम्हाला पाणी दिल.कोरा चहा तयार झाल्यावर तो आनंदाने पीत
सोबत आणलेला खाद्य पदार्थ सोडून त्यावर यत्थेच्छ  ताव मारला.त्या छोट्या घरात व अंगणातीलओटयावर बसुन पोटपूजा करताना स्वर्गसुख जाणवत होतं.पोटपुजा केल्यावर मावशींना चहाचे पैसे देऊ केले.पण ते घेतल्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.तेव्हा आपलेपण समजुन पैसे घ्या असं सांगुन मावशीला बळजबरीने  ५०रुपय देऊ केलेे.मावशींच्या त्या पाहुणचाराने आम्ही भारावलो होतो पण पुढचा बराच टप्पा बाकी होता त्यामुळे पुढे मावशीचा निरोप घेऊन  हातवीज गावाकडेची जाणारी वाट पकडली.पुढीच आमचं ध्येय होता खुटेदारा घाट गाडुन तो उतरणे.व त्याकरिता आम्हाला दुर्गवाडीगावाच्या  बाजूने जाणारी पायवाट पकडायची होती.सुरुवातीला योगेशने पायी चालण्यात वेळ दवडण्याऐवजी गाडी करून पुढील प्रवासाचा  मार्ग सुचवला होता.यामुळे वेळ वाचला असता.पण ट्रेक करायचा तर तो पायीच यावर मी ठा होतो व नियोजनही तसंच होतं.त्यामुळे मी  योगेशला पायी चालण्यास भाग पाडल.त्रिगुणधाराघाटाच्या चढाईने मंडळी बरीच थकली होतो.डोणीपासुन पूढे काही अंतरावर  हतवीजकडे जाणारा डांबरी  रस्ता संपला व पुढे कच्चा रस्ता लागला.आम्ही त्या रस्त्याने आम्ही चालत होतो.चालत असताना थकवाही जाणवत होताच.बराच मोठा ट्रेक झाला होता.पूढे एका लाकुडतोडणारे एक शेतकरी दिसले त्यांना दुर्गकडे जानारी शॉर्टकट पायवाट आहे का हे विचारले तेव्हा त्यांनी वाट कुठे आहे याविषयी काही खाणाखुणा सांगितल्या
ला पण त्या समजल्य की नाही पण आम्ही समजल्या या आविर्भावात कच्ची सडक चालत राहिलो.वाटेत काही अंतरावर मागून एक मावशी येताना दिसली.तीच्यासोबत  गप्पा करत  नक्की वाट कुठे आहे ही  माहिती मिळून घेतली.डोणी गावापासून बरच अंतर पायी चालत आल्यावर थकवा वाटल्याने एके ठीकाही क्षण  विश्रांती घेतली.व पुढची वाट धरली.सुदैवानेे पूढे एक शेतकरी काका जनावरे घेऊन आलेले असताना वर डाव्या हाताला गवतात उभे असताना दिसले.त्यांना आवाज देऊन दुर्गाकडे जाणारी शॉर्टकट पाऊलवाट आहे का ते विचारत असताना नशिबाने तिथेच दुर्गकडे जाणारीवर पायवाट होती.ती त्यांनी व्यवस्था आम्हाला समजावून संगितली
.दुर्गाला जाणारी वाट मिळा्यानेे आम्ही आनंदित झालो होतो.नाहीतर आम्हाला हातवीजला जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.यात वेळ व श्रम दोन्ही वाया गेले असते.असो.त्या देवदुतासारखे वेळीच भेटलेल्या काकांचे आभार मानुन आम्ही दुर्गवाडीकडे जाणारी पायवाट धरली.वाट सोपी व सरळ होती.त्या वाटेने काही मिनिटांचा आम्ही दुर्गादेवी मंदिरासमोर काही अंतरावर येवून ठेपली.पण दूर्गवर जायचं नसल्याने आम्ही डावीकडची वाट पकडली व दुर्गादेवीच्या कोंकणकड्यावरून पुढे चालत राहिलो.दुरगच्याकड्यावरुन खाली दिसणारी दरी छाती धडपडणारी होती.पूढे पायवाटेने वीसेक मिनिटांत  आम्ही खुटेदराघाटाच्या तोंडी साधारण ३.३३का पोहोचलो होतो.

हाच तो क्षण ज्याची मी व योगेश आतुरतेने वाट पाहत होतो.खुटेदरा घाटाने उतरण्याची अपुर्ण इच्छा पुर्ण करण्याची.वरून खाली खुटेदरा घाटाची दरी भयानक वाटत होती. ती दरी पाहून इंद्रनील हा तिसरा सहकारी बावरला व त्याने मला उतरायला जणार नाही असं सांगितलं.मी वयोगेशने त्याच मन वळवण्याचा व  धीर दयायचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.शेवटी नाईलाज इंद्रणीलला दुर्गवाडीची परतीची वाट समजावून सांगितली व काही अंतर दाखवून दिल्यावर मी व योगेश दोघांनीच खुटेदरा घाट उतरायचा ठरवला.या प्रसंगात वीस ते पंचवीस मिनिटे वाया गेली.शेवटी ४वाजता दोघांनीही खुटेदरा घाट उतरायला सुरुवात केली.
सुरुवातीचा खडया उतरणीचा अरुंद कातळटप्पा कौशल्याने उतरुन खाली गेल्यावर पायवाट थोडी रुंद होत डावीकडे वळाली.यानंतरची संपुर्ण पायवाट उजवीकडे डोंगराच्या कडेने फिरुन खाली उतरणारी होती.जागोजागी तीव्र व अरूंद उताराचे कातळटप्पे लागत होते.दोघेही काळजीपुर्वक व योग्य जागी पाय ठेवून घाटातील हे अरुंद ,तीव्र उताराचे टप्पे व घसारयाची पायवाट उतरत होते. इंद्राणीलविषयी काळजी वाटत होती.त्याचा बराच वेळा फोन लावुनही संपर्क होत नसल्याने आमच्या चिंतेत भर पडत होती.मजल दरमजल करत दोघींनीही खुटेदराचे सगळे अवघड व अरुंद काटळटप्पे पार करत काही उतरत्या झाडीने व कारवीने व्यापलेल्या मोकळ्या माळावर आलो.तोपर्यंत सूर्यनारायण मावळतीला लागला होता.तांबुस रंगाचा सुर्य मनोहारी दिसत होता.पुढे हा टप्पा पार करुन खडकाचा एक तीव्र उतरणीला छोटा भाग पार करुन आम्ही  गवताने व्यापलेल्या माळावरुन खाली उतरत असताना एका टप्प्यावर मी पुढे गेल्यावर योगेश पाठीमागुनयेत असल्याने तो कुठपर्यंत आला हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहीले  तेव्हा एक साप गवतातून डावीकडे जाताना दिसला.तो पासुन माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.त्यावेळेस मी क्षणाचाही विलंब न करता योगेशला आवाज देऊन  सापापासुन सावध केल.त्यानेही तो साप पाहिला व तोही क्षणभर जागीच थांबला व नंतर  बाजूने चटकन खाली उतरुन आला.पुढे दोघांनीही सावकाश व काळजीपुर्वक उतरायच ठरवला.इथुन खाली वाट डावीकडे  उतरत होते.वाटेतील  दोन झरेही पार केले.ती उतरुन खाली आल्यावर सपाट लागली.तरीही गाव अजून बरच लांब होता.एव्हाना घडाळ्यात सहा वाजले होते.सूर्य मावळत होता व अंधुक दिसत होत.शरीर थकल होता पण मनात जिद्द कायम होती.ठरवलाप्रमाने आज त्रिगुणधरा घाटाची चढाई व खुटेदराची उतरण दोन्ही व्यवस्थित व सुखरूपपणे पार करत खाली आल्याचं समाधान मनात होत.असो.सपाटीपासुन खाली उजव्या हाताला आम्हाला बैलगाडीची वाट दिसली ती पकडून मोकळ्या पठारावरून दोघेही चालत होतो.अंधार वाढत होता.अवघ्या काही क्षणातआम्ही रामपूर गावत पोहोचलो तेव्हा हायस वाटला.एव्हाना घड्याळात ६.३०वाजले होते.तरी अजून वाघाच्यावाडीत जाऊन आम्हाला अॅक्टीवा घेऊन घरी निघायचा होता.रामपुरहुन वाघाचीवाडी तीनेक किमी अंतरावर होती.रामपुरमध्ये एका घरात आम्ही कुणाची वाडीपर्यंत सोडण्यासाठी गाडी मिळेले का हे विचारले असताना त्या घरातील गृहस्थांनी  त्यांचा मुलगा नुकताच कामावरून आला होता तो थोडा ताजतवाणा झाल्यावर सोडेल हे सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला.ते घर होतं काशीनाथ वाघ या सद्गृहस्थस्थांच.त्यांनी आम्हाला पाणी दिल.घरात बसण्याची विनंती केली.व चटकन दोघांसाठी  चहासुद्धा आणून दिला.त्याच्याशी काही जुजबी गप्पाही केल्या.चहा घेतल्या काशीनाथ यांचा मुलगा  कुलदिपने बाईक काढली व काशीनाथ काकांचे आभर मानून आम्ही दोघेही कुलदीपच्यामागे बाईकवर बसुन वाघाचीवाडीकडे  निघालो.तोपर्यंत दाट अंधार झाला होता.काही मिनिटांनी आम्ही वाघाचीवडीत पोहोचलो.उतरल्यावर कुलदीपला धन्यवाद दिले व बाईकवरुन सोडल्याबद्दल गाडीभाड म्हणुन शंभर रुपये देऊ केलं.पण ते घेतल्यास त्याने नाकारले.तो ते घेताच नव्हता तेव्हा ते बाईकमध्ये पेट्रोल टाक असं सांगत जबरदस्तीने देऊ केले.अॅटीवा सकाळी उभी केलेल्या जागेवर सुरक्षितपणे उभी होती.तेवढ्यात इंद्रनीलचा फोन आला व तो सुखरुप दुर्गवाडीत पोहोचला होता हे कळल्यावर  दोघांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.गाडी पार्किंग केली त्या सद्गृहस्थांनाही मुलांना खाऊसाठी.म्हणून ५०रुपये देऊ केले.व गाडी काढून कुलदीपकच्या मागोमाग निघालो.तो आमच्यासाठी थांबला होता.मढ गावच्या फाट्यावर कुलदीपकला निरोप दिला व आम्ही उजवीकडे धसाईकडे जाणारी वाट पकडली.आता गाडी धसईकडे निघाली.धसईत पोहोल्यावर थोडी पोटपूजा करून दुचाकी उमरोली फाटा गाठुून मुख्य हायवेवरुन अॅक्टीवा टल्याणच्यादिशेने काढली.नेहमीप्रमाणेे योगेश अॅटीवा व्यवस्थित चालवत होता.हायवेवरून बाईक जाताना मनात ट्रेकचमधील घडामोडींच्या आठवणींचा उजाळा सुरू होता.पुढे झटपट अॅक्टीवाने अंतर पार करत योगेशने मला कल्याण स्टेशनवर सोडले तेव्हा ९.३६वाजले होते.पुढे तो मुंबईकडे निघुन गेला.मी खोपोली लोकल पकडून बदलापुरगाठला.आजच्या दिवसाची भटकंती  पडली ती योगेशमुळेचे.त्याचे मानावे तेवढे आभार कमीच. त्याने दुचाकी आणली नसती तर एका दिवसात  एवढं मोठां ट्रेकची पल्ला गाठण शक्य झालं नसतं.एका दिवसात रायगड व पुणे जिल्हा आंबेगाव व जुन्नर  तालुक्याची वेस ओलांडून आम्ही पुन्हा मुरबाड रायगडमध्ये आलो होतो.भटकंतीचा हा प्रसंग अविस्मरणीय व अफलातून होता.वरील सर्व फोटो योगेशने कमेरयाने क्लिक केले आहेत.त्याबद्दल त्याचेही धन्यवाद! दिवसासाठी इथेच थांबतो.निरोप घेऊया.पुन्हा भेटू नवीन भटकंती व नवा अनुभव घेऊन.तोपर्यंत रामराम.

Comments